बारावी परीक्षेचा अर्ज आदल्या दिवशीपर्यंत भरता येणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत विद्यार्थ्यांना नमूद केलेल्या विलंब शुल्कानुसार अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याबाबत मंडळाच्या संकेतस्थळावर सूचना देण्यात आल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने २३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार विभागीय मंडळांनी २२ एप्रिलपर्यंत प्राप्त झालेल्या परीक्षा अर्जांवर कार्यवाही करायची आहे.

दरवर्षी राज्य मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरण्याची संधी दिली जाते. यंदाही ही संधी देण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News