अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर मधील वार्ड नं २ रोशनबी जावेद कच्छी यांचे राहते घराची खिडकीची कडी तोडून खिडकीतुन आत प्रवेश करुन १ लाख ६८ हजार रुपये रोख, मोबाईल व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता.
या घटनेतील दोन चोरांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. २९ ऑगस्ट रोजी रात्री वार्ड नं २ मधील रहिवाशी रोशनबी जावेद कच्छी यांचे घरी चोरी झाली होती.
पोलिस निरीक्षक संजय सानप यांना बातमी मिळाली की,वार्ड नं.२ श्रीरामपुर येथील सराईत आरोपी शहेबाज सलीम शहा,रा. काझीबाबा चौक, श्रीरामपूर, नवाज उर्फ बिडया राजमोहम्मद शेख रा. सिंधी कॉलनी यांनी चोरी केलेली आहे.
त्यांना उपनिरीक्षक कृष्णा घायवट, पोहेकॉ शेख, पंकज गोसावी, सुनील दिघे, पो. कॉ. अंबादास आंधळे, पो. कॉ. राहुल नरवडे, पो. कॉ. किशोर जाधव आदींच्या पथकाने आरोपीचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
त्यांना अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्याने पोलिस काेठडी दरम्यान आरोपींनी ६५ हजार २०० रुपये रोख फिर्यादीचे आधारकार्ड, मतदान कार्ड, व एक काळी पिशवी असा मुद्देमाल काढुन दिला आहे. या सदरील गुन्हयात वापरलेली अॅटो रिक्षा क्र. एमएच १२ एजे ५८१४ ही असल्याने ती देखील जप्त केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम