अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (वय-३२) यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.
त्यास पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय ?:- जाणून घ्या कोपरगाव येथील एका बत्तीस वर्षीय इसमाकडून त्याचे वाळूचोरीत सापडलेले वाहन सोडण्यासाठी ६८ हजार रुपये रकमेची मागणी धोत्रे येथील तलाठी सुशील शुक्ला या नादान तलाठ्याने केली होती.
त्या नंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभाग नाशिक यांचेकडे रीतसर तक्रार केली होती. व त्या प्रमाणे लाचलुचपत विभागाने त्यासाठी कोपरगावात या तलाठ्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता.
त्या नुसार त्यांनी तक्रारदाराने या तलाठ्याकडे तडजोड रक्कम म्हणून २८ हजार रुपये ठरवले होते.व ती रोख २८ हजारांची प्रक्रिया केलेली रक्कम लाच लुचपत विभागाने तक्रारदाराकडे सुपूर्त केली होती.
त्यात त्याला अटक करण्यात आली होती. लाचलुचपत विभागाने या प्रकरणी या तलाठ्यास नुकतेच नीलयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलसी कोठडी सुनावली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम