अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- एक अल्पवयीन मुलगी घरात कोणाला काही एक न सांगता निघून गेली. ही घटना राहुरी तालूक्यात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी घडली.
शुभम पवार या तरूणाने तिचे अपहरण करून पळवून नेल्याचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आलाय. खडांबे परिसरात एक १६ वर्षे ८ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहते.

सध्या त्या मुलीचे कुटूंब दुसऱ्या गावी राहते. ती अल्पवयीन मुलगी तिच्या आई वडीलां सोबत काही दिवसांपूर्वीच खडांबे येथे आले होते. १९ फेब्रुवारी रोजी त्या मुलीचे आई वडील बाहेर गेले होते.
तेव्हा ती मुलगी तिच्या आजी सोबत घरात होती. दुपारी साडेचार वाजे दरम्यान दोन तरूण मोटरसायकलवर आले. तेव्हा ती मुलगी घरात कोणाला काही एक न सांगता बाहेर निघून गेली.
त्या तरूणांनी अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर बसवून नेले. त्या मुलीचे आई वडील घरी आल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
मुलीच्या आई वडीलांनी शुभम पवार तरूणाच्या घरी देहरे येथे जाऊन शोध घेतला. मात्र तो पण गायब आहे. त्यानेच आपल्या मुलीला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय आल्यावर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शुभम पवार राहणार करांडे वस्ती, देहरे, ता. नगर. तसेच आणखी एक अनोळखी तरूण अशा दोघां जणांवर मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ब-हाटे हे करीत आहेत.