पहिल्या पत्नीस फसवून आणखी दोन विवाह, सहा जणांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- पत्नीला फसवून पतीने आणखी दोन लग्न केले. तसेच घर बांधण्यासाठी पहिल्या पत्नीने माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आले.

ही घटना राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे घडली असून गुरुवार 9 सप्टेंबर रोजी राहुरी पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सविता विजय नागरे (वय २४ वर्षे राहणार निंभेरे ता. राहुरी) हिने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आहे .

सविता गागरे हिचा विवाह विजय नागरे याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिला व्यवस्थीत नांदवले. त्यानंतर सविता हिस सासु सासरे व पती यांनी आपल्याला गायांचा धंदा करायचा तु तुझ्या आई वडीलांकडुन दोन लाख रूपये आण.

सविता हिने माहेरहून दोन लाख रूपये आणून दिले. काही दिवसांनी परत गाडी घ्यायची म्हणून एक लाख रूपये घेवुन येण्यास सांगितले. एक लाख रूपये घेतल्यानंतर पुन्हा घर बांधण्यासाठी दोन लाख रूपये आणावेत.

म्हणून सविता हिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. दरम्यान सविता हिला फसवून तीचा पती विजय याने शेवगाव येथील अलका तांदळे व त्यानंतर संगमनेर येथील अक्षदा घूगे या दोन तरूणी सोबत लग्न केले.

नंतर सविता हिने घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. यासाठी तिचा सासरच्या लोकांकडून शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला.

सविता विजय नागरे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत विजय उर्फ गणेश विठ्ठल नागरे, सखुबाई विठठल नागरे, विठ्ठल कारभारी नागरे, सोनल गणेश शेळके,

गणेश विठ्ठल शेळके, गणेश भाउसाहेब सांगळे सर्व राहणार निंभेरे ता. राहुरी. या सहा जणांवर फसवणुक व पैशासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe