साठवण तलावाच्या नलिकेत दोन गोण्यांत मृत अवस्थेत आढळल्या…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील वाकडी येथे गोदावरी कालव्यातुन साठवण तलावाकडे जाणार्‍या नलिकेत मृतावस्थेत असलेल्या दोन गोणी भरुन गावरान जातीच्या कोंबड्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 16 रोजी सकाळी खंडोबा देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्याकडेला असंख्य कावळे व कुत्रे नागरिकांना दिसले.

तसेच तिथे दोन गोण्या आढळून आल्या. त्यातुन कुत्रे तसेच कावळे यांनी काही मृतावस्थेतील कोंबड्या दिसल्या. एवढ्या प्रमाणात कोंबड्या एकत्र कशामुळे मृत झाल्या हा प्रकार नेमका काय? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहे.

या वर्दळीच्या ठिकाणी हा घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. दरम्यान हा प्रकार कोणी केला? या अज्ञात इसमाचा शोध घेऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

या पांढर्‍या रंगाच्या गोण्या एका नामांकित कंपनीच्या कोबंडी खाद्याच्या दिसत आहेत. यातून काही मृत कोंबडीचे पक्षी हे कुत्र्यांनी परिसरात नेले आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

या घटनेची माहिती मिळताच सरपंच डॉ. संपतराव शेळके यांनी पशुवैद्यकिय अधिकारी श्री. भांड यांना माहिती देवून या मृत पक्षांचा नमुना घेतला असून याबाबत अहवाल आल्यानंतर या कोबंड्याचे मृत्युचे कारण समजणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
  • #Former Union Minister Dilip Gandhi dies
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe