Pm Kisan Yojana: अखेर मुहूर्त ठरलाचं! ‘या’ दिवशी जमा होणार करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार

Published on -

Pm Kisan Yojana : भारत हा एक 130 कोटी लोकसंख्या असलेला कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील बहुतांश जनसंख्या की प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर (Farming Business) अवलंबुन आहे.

मात्र असे असतांना देखील आपल्या देशातील शेतकऱ्यांची (Farmers) आर्थिक स्थिती खुपच दयनीय आहे. देशातील शेतकरी बांधवांना वारंवार अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा (Climate Change) तर कधी शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर तसेच मायबाप शासनाचे (Government Policy) धोरण या सर्व्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

मात्र असे असतानाही बळीराजा मोठ्या हिमतीने शेती कसत आहे. भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की अनेक अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. हिच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे.

पीएम किसानचा हफ्ता लवकरच येणार
देशात राष्ट्रीय स्तरावर शेतकरी हिताच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Prime Minister Kisan Sanman Nidhi Yojana) ही देखील अशीच एक शेतकरी हिताची आणि विशेष म्हणजे वर्तमान पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी (Narendra Modi) यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत दरवर्षी भारतातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे वार्षिक सहा हजार शेतकऱ्यांना एकूण तीन हफ्त्यात दिले जातात. आता पर्यंत या योजनेचे 10 हप्ते सरकारने पाठवले आहेत.

म्हणजेच एका शेतकऱ्याला आत्तापर्यंत जवळपास वीस हजारांची मदत मोदी सरकार कडून देण्यात आली आहे. सध्या देशातील करोडो शेतकरी पुढच्या म्हणजे 11व्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे लवकरच मोदी सरकार या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहे.

यामुळे निश्चितच या योजनेच्या कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की या योजनेचा 11वा हफ्ता याचं महिन्यात म्हणजेच मे मध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 11वा हफ्ता 31 मे पूर्वी हस्तांतरित केला जाऊ शकतो. दोन हजार रुपयांची ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

ई-केवायसी केली आहे बंधनकारक
मित्रांनो ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेत अनेक बदल मोदी सरकारकडून करण्यात आले आहेत. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी मोदी सरकार कडून बंधनकारक करण्यात आले आहे.

जर या योजनेच्या पात्र एखाद्या पात्र शेतकऱ्याने अजून ई-केवायसी केली नसेल तर तो योजनेपासून वंचित राहू शकतो. विशेष म्हणजे सरकारने केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत वाढवली आहे.

आता शेतकरी 31 मे 2022 पर्यंत ई-केवायसी करू शकतात. काही काळापूर्वी आधार आणि ओटीपीद्वारे ई-केवायसी काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र आता ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe