भरबाजारपेठेत दुकान लावण्याच्या कारणावरून दोन महिलांना लोखंडी पाईपने मारहाण

Published on -

राहुरी शहरातील बाजार पेठेत दुकान दोन महिलांना लोखंडी पाईपने मारहाण लावण्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी दोन महिलांना लोखंडी पाईपने व लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दरम्यान दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

सौ. आशा संतोष पटारे, वय ४० वर्षे, धंदा- भाजीपाला विक्री राहणार तनपुरेवाडी रोड, राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,

सौ. आशा पटारे या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सौ.आशा पटारे यांची आई गोदाबाई शेटे या दिनांक ३ नोव्हेंबर रोजी शहरातील भागिरथी शाळा रोड लगत रुद्राक्ष मोबाईल दुकान समोर भाजीपाला विक्री करत होत्या.

यावेळेस आरोपी अमोल बाबासाहेब थोरात, उमेश बाबासाहेब थोरात तसेच एक पप्पू नामक तरूण हे त्या ठिकाणी आले. आणि सौ. आशा पटारे यांना म्हणाले कि, तुम्ही येथे भाजी विक्री दुकान लावायचे नाही.

असे म्हणुन शिवीगाळ करत होते. तेव्हा सौ. आशा पटारे त्यांना म्हणाल्या की तुम्ही माझी आई व भाऊला शिवीगाळ का करता शिवीगाळ करू नका.

असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी सौ. आशा पटारे यांचे आईला शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांने मारण्यास सुरूवात केली. तेव्हा सौ. आशा पटारे त्यांचे भांडणे सोडवण्यासाठी गेल्या असता अरोपींनी त्यांना लोखंडी पाईपने व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेत सौ. आशा पटारे, गोदाबाई शेटे व संतोष शेटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सौ. आशा पटारे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी अमोल बाबासाहेब थोरात, उमेश बाबासाहेब थोरात दोघे राहणार तनपूरे वाडी रोड तसेच एक पप्पू नामक तरूण या तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News