महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्रीशी चर्चा करून निर्णय घेणार – उदय सामंत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत चर्चासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक घेतली.

उदय सामंत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन महाविद्यालयातील शिक्षण ऑफलाईन की ऑनलाईन यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

आज संध्याकाळी ४ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत निर्णय जाहीर करणार आहेत. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल प्रत्येक जिल्ह्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला.

विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सोबत ऑनलाइन आढावा बैठक झाली आहे. महाविद्यालय सुरु राहणार का नाही हा निर्णय आज संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधानसचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण संचालक धनराज माने,

तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांत राज्यात मुंबई,

ठाणे आणि पुणे या शहरातील पहिली ते नववी आणि अकरावीचे ऑफलाइन वर्ग बंद करण्यात आले. तसा काहीसा निर्णय विद्यापीठ आणि महाविद्यालयांबाबत होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe