“उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणतात, मात्र शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नाही”

Published on -

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कडवी टीका केली आहे. २०२४ च्या आगामी विधानसभा निवडणुकीवरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे.

नारायण राणे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election) शिवसेनेचे 20 आमदारही निवडून येणार नाहीत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच नारायण राणे यांनी महापालिका निवडणूक जिंकण्याचाही विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वताला वाघ म्हणवतात, पण प्रत्यक्षात शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नसल्याचे राणे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला (Maharashtra) १० वर्षे मागे नेल्याची घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली आहे.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जेवढी मतं मिळायला हवी होती, तेवढीही मतं आघाडीला मिळालेली नाहीत.

उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे की सत्तेला 145 मते लागता, तुम्ही अल्पमतात आलेले आहात. तुम्ही राजीनामा द्या, नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या. असे नारायण राणे म्हणाले.

सत्तेवर राहण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नसल्याचेही राणे म्हणाले. आघाडीतील 8-9 आमदार फुटतात तर विश्वासहर्तता आहे कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

स्वताचे आमदार सांभाळता येत नाहीत, आणि बढाया मारतात. अशी टीका त्यांनी केली. आम्ही विरोधात असूनही आमदार एकसंध ठेवू शकलो. भाजपाची मते जास्त आहेत. असा दावाही राणे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करण्याचीही संधी सोडली नाही. पत्रकार परिषदेमध्ये बोलता राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे, ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीपूर्वी काही जण बढाया मारत होते, तीन जागा काढणार, भाजपाची मतं फोडणार,

मात्र प्रत्यक्षात काय झालं, असा सवाल राणेंनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या इतिहासात न वापरलेली भाषा उद्धव ठाकरेंनी वापरली. मुख्यमंत्र्यांची भाषा संसदीय नव्हती, अशी टीकाही राणेंनी केली.

पराभवामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशात नामुष्की, बेअब्रू झाली. असेही राणे म्हणाले. संजय राऊत काठावर आलेत, आमच्या हातातून वाचले आहेत, असे म्हणत त्यांनी राऊतांनाही इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News