मुंबई : देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या १८ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएने आदिवासी नेतृत्व म्हणून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू यांना एनडीएचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाने देखील दौपदी मुर्मू यांनाच आपला पाठिंबा जाहिर केला आहे. आता शिवसेनेच्या एका खासदाराने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत भाष्य केले आहे. पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, यापुर्वी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे आपला पाठिंबा कोणाला देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.