“मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील” महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात जोरदार घमासान सुरु आहे. हे सगळं सुरु झालं ते शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) ४० आमदार फोडल्याचे बोलले जात आहे. आणि शिंदे हे भाजप (BJP) सोबत जाण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे.

या सर्व प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीतील (Mahavilkas Aghadi) काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पदाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

बाळासाहेब थोरात कॅबिटेनच्या बैठकीसाठी आले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच (CM Uddhav Thackeray) राहतील, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले आहे. मात्र काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लग्न झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच नकारात्मक ट्विट केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने.. असे ट्विट राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांच्या या ट्विटवरही बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असे संकेत संजय राऊत यांनी दिले. त्यावर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय, हे त्यांनाच विचारले पाहिजे.

विधानसभा बरखास्तीचा विषयच आमच्यासमोर आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार कशी, असा सवाल त्यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवर त्यांनाच विचारायला हवे. उलटसुलट चर्चा होत आहेत. मात्र या केवळ चर्चा आहेत, असेही थोरात म्हणाले आहेत.

पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोण काय दावा करते याला महत्त्व नाही. संख्याबळ आमच्याकडेच आहे. आम्हाला कोणताही धोका नाही. ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या अत्यंत चुकीच्या आहेत. मंत्रिमंडळ बैठक चांगली होईल, आम्ही चांगले निर्णय घेऊ.

आमच्याकडे असलेल्या विषयांवर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहोत. दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता जाणार, अशा चर्चा होत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील, असे ठामपणे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe