अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- भावासोबत खेळत असताना बारा वर्षाच्या बहिणीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला . ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दु. येथे घडली असून, साक्षी श्रीकांत शेळके असे त्या मुलीचे नाव आहे.
या प्रकरणी निलेश शेळके यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर दिली असून, त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शुक्रवार दि.३ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तांदळी दु.

येथील श्रीकांत शेळके यांची २ मुले शेतातील घरासमोर खेळत असताना खेळता खेळता बारा वर्षीय साक्षी विहिरीच्या पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत निलेश शेळके यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर दिली.
त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम