केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले…पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- पाकिस्तानच्या भारत विरोधी कारवाया पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. हे असेच सुरू राहणार असेल तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो; असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

ते गोव्यातील धरबोंद्रा येथे एका कार्यक्रमात बोलत होते. गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पाच वpर्षांपूर्वी भारताच्या सर्जिकल स्ट्राइकने जगाला एक मजबूत संदेश दिला की त्याच्या सीमेत कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही.

काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायांसाठी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला चढवला. शहा म्हणाले की, पाकिस्तानने काश्मीर प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची चूक करू नये.

पाकिस्तानने त्याच्या मर्यादेत राहावे. जर पाकिस्तानने आपल्या सीमा ओलांडल्या तर भारत दुसरा सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून मागे हटणार नाही.

मागील काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची तीव्रता वाढू लागली आहे. काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. अलिकडेच दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला होता.

या घटनांनंतर भारताच्या जवानांनी केलेल्या कारवाईत काही दहशतवादी ठार झाले. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार दहशतवादी पाकिस्तानच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!