OnePlus Phone Offers : तुम्ही जर स्वस्तात OnePlus स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सध्या Amazon वर ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु आहे.
या सेलदरम्यान तुम्ही आता OnePlus चे प्रीमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. त्यामुळे स्वस्तात मस्त आणि जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन विकत घेण्याची संधी गमावू नका.

1. OnePlus 10 Pro 5G
OnePlus च्या OnePlus 10 Pro 5G या शक्तिशाली स्मार्टफोनची किंमत 66,999 रुपयांपासून सुरू होते. परंतु तुम्ही SBI बँक कार्ड आणि इतर ऑफरसह ते 55,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीवर खरेदी करू शकता.
तसेच या स्मार्टफोनवर 18,000 रुपयांपेक्षा जास्त एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. या प्रीमियम फोनमध्ये कंपनीने 6.7-इंच फ्लुइड AMOLED डिस्प्ले व्यतिरिक्त, 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट दिला आहे.
2. OnePlus 10T 5G
150W फास्ट चार्जिंग आणि 6.7 इंच हाय-रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले असणाऱ्या OnePlus 10T 5G या फोनची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होते. बँक ऑफरसह हा फोन तुम्ही 44,999 रुपयांना सेल दरम्यान खरेदी करू शकता. यावर 18,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. 4G iOS किंवा 4G OnePlus फोनची देवाणघेवाण केली तर यावर तुम्हाला 5,000 रुपये अतिरिक्त सवलत मिळेल.
3. OnePlus Nord 2T 5G
मिडरेंज सेगमेंटमध्ये, सेल दरम्यान ग्राहकांना OnePlus Nord 2T 5G हा स्मार्टफोन जवळपास 27,499 रुपायांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे, या स्मार्टफोनची मूळ किंमत 28,999 रुपयांपासून सुरू होते.
6.43 इंच AMOLED डिस्प्ले व्यतिरिक्त, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा सेटअप कंपनीने दिला आहे. तसेच या फोनवर ग्राहकांना 18,050 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा लाभही दिला जात आहे, त्यानंतर तो 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
4. OnePlus Nord CE2 Lite 5G
OnePlus Nord CE2 Lite 5G या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. परंतु, आता हा स्मार्टफोन SBI कार्डच्या मदतीने 17,999 रुपयांना खरेदी करू शकता. यात 17,600 पर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे आणि फोनमध्ये 64MP कॅमेरा व्यतिरिक्त, Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.