Upcoming EV Scooter : Ola आणि Ather ला टक्कर देण्यासाठी बाजारात येतेय ही शानदार इलेक्ट्रिक स्कुटर, सिंगल चार्जमध्ये देईल 236 किमी; जाणून घ्या किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Upcoming EV Scooter : मागील काही दिवसांपासून देशात इंधनाच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे आता सर्व कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करत आहेत. या सर्व कंपन्यांच्या स्कुटरमध्ये एकापेक्षा एक शानदार फीचर्स दिले जात आहेत.

अशातच आता Ola आणि Ather ला टक्कर देण्यासाठी बाजारात एक शानदार इलेक्ट्रिक स्कुटर येत आहे. जी सिंगल चार्जमध्ये 236 किमी रेंज देईल. इतकेच नाही तर आगामी स्कुटरमध्ये 30 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे.

मिळणार 30 हजार रुपयांपर्यंत सवलत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही स्कूटर 23 मे 2023 रोजी बाजारात लॉन्च करण्यात येईल. इतकेच नाही तर कंपनी या स्कूटरवर 30,000 रुपयांपर्यंत सवलत देणार आहे. कंपनीच्या या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख रुपये इतकी आहे. अजूनही तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्कूटर बुक करता येईल.

सिंगल चार्जवर मिळेल 236 किमी मायलेज

आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 4.8 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक उपलब्ध असणार आहे. जी 8.5 kW मोटरसह जोडली आहे. सिंगल चार्जवर ही स्कूटर 236 किमी पर्यंत धावेल. ही स्कूटर 11bhp पॉवर आणि 72 Nm टॉर्क जनरेट करेल. तसेच या स्कूटरमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी, एलईडी हेडलॅम्प, 7 इंच टच स्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन सिस्टम यांसारखी शानदार फीचर्स देण्यात आली आहेत.

मिळतील 4 राइडिंग मोड

आगामी स्कूटरमध्ये इको, राइड, डॅश आणि सोनिक असे ४ राइडिंग मोड दिले जाणार आहेत. ही स्कूटर तुम्हाला ब्राझन ब्लॅक, अझूर ब्लू, ग्रेस व्हाइट आणि नम्मा रेड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. दरम्यान अनेक दिवसांपासून चाहते या स्कूटरची आतुरतेने वाट पाहत होते. लाँच झाल्यानंतर ही स्कूटर बाजारात Ola S1 Pro आणि Ather 450X ला टक्कर देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe