Upcoming Smartphones List : नवीन स्मार्टफोन घेताय? जरा थांबा, ‘या’ महिन्यात लाँच होणार आहेत सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; पहा यादी

Ahmednagarlive24 office
Published:

Upcoming Smartphones List : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. फोन खरेदीची लगेच घाई करू नका. कारण या महिन्यात सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच होणार आहेत. इतकेच नाही तर हे सर्व स्मार्टफोन तुम्ही कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता.

त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊन स्वस्तात जबरदस्त फीचर्स या फोनमध्ये तूम्हाला मिळतील. दरम्यान गुगल पिक्सेल, सॅमसंग, वनप्लस, रियलमी यांसारख्या दिग्ग्ज कंपन्यांसह इतर कंपन्यांचे फोन या महिन्यात लाँच केले जाणार आहेत. पहा सविस्तर यादी.

या महिन्यात गुगल पिक्सेल, सॅमसंग, वनप्लस, रियलमी, लावा या स्मार्ट फोनसह अनेक कंपन्यांचे फोन बाजारात येणार आहेत. यात प्रीमियमसह अनेक लोकप्रिय ब्रँड्सचे फोन परवडणारे लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाहुयात यादी.

लाँच होणार हे स्मार्टफोन

1. Google Pixel Fold Phone- Google आगामी Google I/O 2023 इव्हेंटमध्ये आपला Pixel Fold फोन लॉन्च करणार आहे. 10 मे 2023 रोजी होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हा फोन अधिकृतपणे सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमधील बाह्य डिस्प्ले 5.8 इंच आणि अंतर्गत डिस्प्ले 7.69 इंच असणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असणार आहे. या फोनची किंमत 145,690 रुपये असेल.

2. Google Pixel 7a- Google Pixel Fold शिवाय, कंपनीचा Pixel 7A देखील Google I/O 2023 इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाणार आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.1-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. या फोनमध्ये 4500 mAh बॅटरी असून किमतीचा विचार केला तर या फोनची किंमत 45,990 रुपये असेल. Google Tensor G2 चिपसेट सह येणारा हा फोन 64MP OIS कॅमेरा सह असेल.

3. Oneplus Nord 3- वनप्लसचा नवीन स्मार्टफोन याच महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. लवकरच OnePlus Nord 3 भारतात सादर केला जाणार आहे. यात 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले असून जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. यात 80W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी असणार आहे. भारतात या फोनची किंमत 27,999 रुपये असणार आहे.

4. Samsung Galaxy F54- सॅमसंग आपला Samsung Galaxy F54 पुढच्या महिन्यात लॉन्च करणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल. या फोनमध्ये 6.7 इंच फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले असेल. 108MP मुख्य कॅमेरा असणारा हा फोन 24,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाणार आहे.

5. Realme 11 Pro सीरिज : या महिन्यात Realme 11 Pro सीरिज भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ या दोन फोनचा समावेश असणार आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये बरेच साम्य असणार आहे. हे दोन्ही फोन 5,000mAh बॅटरीद्वारे समर्थित असणार आहेत. दोन्हीमध्ये Dimensity 7000 सीरिज चिपसेट असेल. Realme 11 Pro ची किंमत 28,990 रुपये तर Realme 11 Pro Plus ची किंमत 34,990 रुपये असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe