UPI झालं डाऊन! लाखो युजर्सना व्यवहार करता येईना, वाचा काय आहे कारण आणि कधी सुरु होणार सेवा?

आज UPI सेवांमध्ये मोठा बिघाड झाल्याचं दिसून येतंय. यामुळे सकाळपासूनच गुगल पे, पेटीएम, फोनपे सेवा बंद झाल्या आहेत. याचा थेट परिणाम हा वापरकर्त्यांच्या पेमेंट्सवर झालाय. UPI सेवा बंद झाल्याने सोशल मीडियावर तक्रारींचा महापूर दिसून येतोय.

Published on -

English Title: UPI Outage | देशभरातील लाखो नागरिकांसाठी आजचा दिवस डिजिटल पेमेंटच्या बाबतीत काळजीचा ठरला आहे. गुगल पे, फोनपे, पेटीएम यांसारख्या प्रमुख UPI आधारित अ‍ॅप्स अचानक बंद पडल्यामुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे छोट्या दुकानदारांपासून ते प्रवाशांपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसला आहे.

तक्रारींचा अक्षरशः पूर

UPI प्रणालीच्या अचानक बिघाडामुळे सोशल मीडियावर याबाबत तक्रारींचा अक्षरशः पूर आला. वापरकर्त्यांनी अयशस्वी पेमेंट, अ‍ॅप क्रॅशेस, आणि ‘एरर मेसेजेस’चे स्क्रीनशॉट्स शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. “पेट्रोल पंपावर पैसे द्यायला कार्ड किंवा कॅश नव्हती, आणि GPay काम करत नव्हता… काय हे?”, अशी एक प्रतिक्रिया बेंगळुरूच्या नागरिकाकडून आली. तर, दिल्लीतील एका वापरकर्त्याने, “तीन वेळा फोनपेवरून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी अयशस्वी… लवकर दुरुस्त करा,” असे लिहिले.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या तांत्रिक अडचणीची कबुली दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की काही वापरकर्त्यांना UPI सेवा वापरण्यात अडचण येत आहे आणि यावर तातडीने उपाय योजना सुरू करण्यात आली आहे. NPCI च्या प्रवक्त्याने म्हटले, “आम्हाला या तांत्रिक अडचणीची कल्पना असून, भागीदार बँका आणि सेवा प्रदात्यांच्या मदतीने आम्ही समस्येचे निराकरण करत आहोत. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.”

कधी सुरू होणार सेवा?

या घडामोडीमुळे नागरिकांमध्ये एकीकडे नाराजी आहे, तर दुसरीकडे काहींनी सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रिया देत मीम्स पोस्ट केले. “यूपीआय बंद = चहा थांबला”, “आज सगळे फुकट खातील” अशा मजेदार ओळींसह नेटकर्‍यांनी या प्रसंगाला थोडे हसण्याचे कारण बनवले.

UPI ही भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट प्रणाली असून, ती रोज लाखो व्यवहारांसाठी वापरली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम करत आहेत. NPCI ने या समस्येचे तातडीने समाधान करावे, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News