UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना असे प्रश्न दिसतात जे सहसा सोप्पे असतात, मात्र विद्यार्थ्यांचा अपुरा अभ्यास असल्याने या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना कठीण होऊन जाते.
दरम्यान, मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : कोणत्या देशात एकही तुरुंग नाही?
उत्तर : नेदरलँड
प्रश्न : महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
उत्तर : जायकवाडी धरण
प्रश्न : वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
उत्तर : नायट्रोजन
प्रश्न : एक सिगरेट माणसाच्या आयुष्यातील किती वेळ कमी करते?
उत्तर : ११ मिनिटे
प्रश्न : प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : सातारा
प्रश्न : वजन वाढण्यासाठी अंड्यातील कोणता पदार्थ खातात?
उत्तर : पिवळा