UPSC Interview Questions : कोणत्या देशात च्युइंगमवर बंदी आहे? UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

UPSC Interview Questions : देशात दरवर्षी UPSC सारख्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र या परीक्षेमध्ये (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात ते ऐकून मुलखात देणारा उमेदवार (Candidate) गोंधळात पडू शकतो.

परीक्षांमधील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC IAS परीक्षा. या परीक्षेतील लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे ‘आत्मविश्वास’ आणि ‘चौकटीच्या बाहेर’ विचार करण्याची क्षमता.

IAS मुलाखतीचे प्रश्न खूप चर्चिले जातात. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा जितकी कठीण तितकीच मुलाखत (IAS Interview) अधिक कठीण असते.

UPSC मुलाखतीचे प्रश्न उमेदवारांच्या IQ चाचणीसाठी विचारले जातात. कधी कधी हे प्रश्न फारच विचित्र असतात तर कधी ते अतिशय महत्त्वाच्या विषयावर आधारित असतात.

त्यामुळेच नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यात चांगली माणसे घाम गाळतात, असे म्हणतात. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला काही अवघड प्रश्‍न (Questions) आणि त्यांची सडेतोड उत्तरे सांगत आहोत.

प्रश्न: पृथ्वीवरील कोणत्या प्राण्याचे डोळे सर्वात मोठे आहेत?
उत्तर: जायंट स्क्विड

प्रश्न: १३व्या-१४व्या शतकात भारतीय शेतकऱ्यांनी कशाची लागवड केली नाही?
उत्तर: मका

प्रश्न: सोन्याच्या शुद्धतेची व्याख्या काय आहे?
उत्तर: कॅरेट

प्रश्न: भारतात हिऱ्याच्या खाणी कुठे आहेत?
उत्तर: पन्ना मध्य प्रदेश.

प्रश्न: फुग्यांमध्ये कोणता वायू भरला जातो?
उत्तर: हेलियम

प्रश्न: कोणत्या देशात च्युइंगमवर बंदी आहे?
उत्तर: सिंगापूर

प्रश्न: कोणत्या कीटकाचे रेशीम स्टीलपेक्षा मजबूत आहे?
उत्तरः स्पायडर सिल्क

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe