UPSC Interview Questions : असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलते? विचारात पाडणारे मुलाखतीतील प्रश्न, जाणून घ्या उत्तर

Content Team
Published:

UPSC Interview Questions : स्पर्धा परिक्षांच्या मुलाखतीत ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरे देणे सोपे नसते. उत्तरही आजूबाजूलाच असते, पण आपण त्या उत्तराची (Answer) कल्पनाही (Imagination) करू शकत नाही.

अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी करतात. असे असूनही, परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्क क्षमता (UPSC मुलाखत) तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो परंतु उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.

UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : अशी कोणती वस्तू आहे ज्या वस्तूची सावली दिसत नाही?

उत्तर : रस्ता

प्रश्न : असा कोण आहे जो हाताने नाही तर नाकाने काम करतो?

उत्तर : हत्ती

प्रश्न : असा कोणता प्रश्न आहे ज्याचे उत्तर सतत बदलते?

उत्तर : ‘किती वाजलेत’

प्रश्न : असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

उत्तर : इंग्लंडच्या सॅफोल समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १०-१२ किमी अंतरावर असलेला ‘सीलँड’ हा एक देश आहे जिथे लोकसंख्या फक्त २७ आहे. या देशाचे क्षेत्रफळ टेनिस कोर्टएवढे आहे.

प्रश्न : कोणता दुकानदार तुमचा माल घेतो आणि तुमच्याकडून पैसेही घेतो?

उत्तर : न्हावी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe