UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात जे सहसा सोप्पे असतात. मात्र तुम्हाला अपुरी माहिती असल्यामुळे तुम्हाला ते अवघड होऊन जाते.
दरम्यान, UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/06/1152769-upsc-success-tricks.jpg)
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : कोणत्या देशात सूर्य मध्यरात्री सुद्धा उगवतो?
उत्तर : नॉर्वे
प्रश्न : कोणत्या देशात सर्वात जास्त पिण्यायोग्य पाणी आहे?
उत्तर : ब्राझील
प्रश्न : विमानामध्ये कोणते तेल वापरतात?
उत्तर : केरोसीन
प्रश्न : कोणत्या प्राण्याला 5 डोळे असतात?
उत्तर : मधमाशी
प्रश्न : मुकेश अंबानी यांचा जन्म कुठे झाला होता?
उत्तर : यमन देशात मुकेश अंबानी यांचा जन्म झाला होता
प्रश्न : सर्वात मोठे रावणाचे मंदिर कुठे आहे?
उत्तर : हरियाणा
प्रश्न : खोटे बोलताना शरीराचा कोणता भाग गरम होतो?
उत्तर : नाक