URBAN Smartwatch : आता बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टवॉच लाँच होऊ लागले आहेत. तरुणाईला स्टायलिश लूक असणाऱ्या स्मार्टवॉचचे वेड लागले आहे. गरज आणि मागणी लक्षात घेता कंपन्या आपले स्मार्टवॉच घेऊन येत असते. प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये फीचर्स वेगळे असते.
तसेच त्यांच्या किमतीही वेगवेगळ्या असतात. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणतेही स्मार्टवॉच खरेदी करू शकता. लोकप्रिय स्मार्टवॉच निर्माता कंपनी URBAN ने सणासुदीच्या लाँचचा भाग म्हणून आपले 2 नवीन कॉलिंग स्मार्टवॉच लाँच केले आहेत.
अर्बन वेव्ह थ्री आणि अर्बन नोव्हा दोन्ही स्मार्टवॉच ट्रेंडी डिझायनर स्मार्टवॉच आहेत. महत्त्वाचे म्हणजे जर तुमचे स्मार्टवॉच खरेदीचे बजेट जास्त नसेल तर काळजी करू नका. तुम्ही हे स्मार्टवॉच खूप स्वस्तात खरेदी करू शकता. जाणून घ्या त्यांच्या किंमत आणि फीचर्सची माहिती.
जाणून घ्या अर्बन वेव्ह थ्री चे फीचर्स आणि किंमत
फीचर्सचा विचार केला तर अर्बन वेव्ह थ्री मोठ्या 1.91” सुपर एचडी डिस्प्ले आणि 3 अदलाबदल करण्यायोग्य स्ट्रॅप्स जसे की मेटल, PU लेदर, प्रीमियम सिलिकॉन दिले आहे. यात ब्लूटूथ कॉलिंग वैशिष्ट्य, AI व्हॉईस असिस्टंट, हेल्थ मॉनिटरिंग आणि बरेच काही मिळेल. किमतीचा विचार केला तर 2499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. हे वॉच प्रीमियम पॅकेज पॅकसह येतो.
जाणून घ्या URBAN Nova चे फीचर्स आणि किंमत
अर्बन नोव्हा एका स्टायलिश लुकसह तुम्हाला करता येईल. यात ट्रेंडी नवीन स्ट्रॅप डिझाइन, फुल एचडी डिस्प्ले, प्रगत बीटी कॉलिंग, एआय व्हॉईस असिस्टंट, एकाधिक सानुकूलित स्मार्टवॉच चेहरे आणि बरेच काही यात पाहायला मिळेल. हे स्टायलिश स्मार्टवॉच तुम्ही 9 ट्रेंडी रंगांमध्ये खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर हे स्मार्टवॉच 1799 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.