पिण्याच्या पाण्यासाठी तांब्याचं भांडं वापरा ! होईल हे फायदे…

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-   अलीकडे बॉटलमधलं पाणी पिण्याचंच प्रमाण जास्त आहे, कारण ते सोयीचे पडते. परंतु प्लॅस्टिकच्या बॉटलमधलं पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगलं नसतं.

बदलत्या वातावरणामुळे माणसाला अनेक आजारांना बळी पडावे लागते, या आजाराशी लढण्याची शक्‍ती देण्यासाठी तांबं तुम्हाला मदत करू शकते.

० तांब्यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात. यामध्ये पाणी ठेवल्यास पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे आजार रोखण्यास मदत होते.

० तांब्यातील कॉपर थायरॉक्सीन हार्मोनला संतुलित ठेवते. यामुळे थायरॉइडचा धोका दूर होण्यास मदत होते. ० सांधेदुखीचा त्रास असेल तर रोज सकाळ, संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल.

० वजन कमी करण्यासही तांबे उपयुक्‍त आहे, रोज सकाळ संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने एक्स्ट्रा फॅट कमी होतील.

० हृदयाच्या आरोग्यासाठीही तांबे चांगले आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते व हृदय मजबूत होते.

० तांब्यात असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम लवकर बरी करण्यास मदत करतात.

० तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने यामधील कॉपर रक्‍ताची कमतरता दूर करेल. यामुळे अँनिमियाचा धोका टळण्यास मदत होईल.

० तांब्याच्या भांड्यातील पाणी हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्‍त आहे.

० रोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यावे. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊन त्वचा उजळेल.

० कमीत कमी ८ तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे ऑसिडीटी आणि गॅसची समस्या दूर होऊन पचनक्रिया चांगली राहते.

० पाणी भरून ठेवलेलं तांब्याचं भांड नेहमी लाकडावर ठेवा, तरच त्याचा उपयोग होतो.