Vastu Tips : घराच्या उत्तर दिशेला लावा ‘ही’ झाडे, आपोआप व्हाल मालामाल..

Ahmednagarlive24 office
Published:
Vastu Tips

Vastu Tips : आपल्या आयुष्यातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य त्या दिशेला ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, असे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात येते. इतकेच नाही तर त्या गोष्टी योग्य पद्धतीने लक्षात ठेवल्या तर आपोआप घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते.

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य बाब असणारा पैसा टिकवण्यासाठी योग्य ठिकाणी, योग्य दिशेला काही झाडे लावली तर तुम्हाला जास्त धनलाभ होतो. अशी झाडे लावली तर तुम्हाला लक्ष्मी आणि कुबेर देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

तुळस

हिंदू धर्मामध्ये तुळशीला पूजनीय मानण्यात येते. खरंतर तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे बोलले जाते. त्यामुळे घरात उत्तर दिशेला तुळशीचे रोप नक्कीच लावाव. असे केले तर आर्थिक स्थिती सुधारली जाते. तसेच जर कोणते काम रखडले असेल तर ते पूर्ण होते.

मनी प्लांट

वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटला पैसा आकर्षित करणारे मानले जाते. त्यामुळे ते घरात लावत असताना खूप काळजी घेणे महत्त्वाचे आहे. वास्तु तज्ज्ञांच्या मतानुसार घराच्या उत्तर दिशेला निळ्या रंगाच्या बाटलीत किंवा भांड्यात मनी प्लांट लावणे शुभ असते. हे लक्षात ठेवा, समजा मनी प्लांटची वेल खाली लटकली असल्यास तर ते चांगले मानले जात नाही.

बांबू

वास्तु तज्ज्ञांच्या मतानुसार, बांबूचे रोप लावले तर घरामध्ये सुख-शांती राहते. त्यामुळे ही वनस्पती घराच्या उत्तर दिशेला ठेवली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वनस्पती घरासाठी खूप फायदेशीर असते. बांबूमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

केळी

वास्तु तज्ज्ञांच्या मतानुसार, जर तुम्ही घराच्या उत्तर दिशेला केळीचे झाड लावून गुरुवारी त्याची पूजा केली तर तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसेच केळीच्या झाडाखाली गुरुवारी शुद्ध तुपाचा दिवा लावला तर सौभाग्य प्राप्त होते. असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. परंतु हे लक्षात लक्षात ठेवा की ही वनस्पती घराच्या आत किंवा बाहेर सुकू नये. कारण असे झाले तर नकारात्मक ऊर्जा पसरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe