Vasu Baras : ‘हे’ आहे शेतकऱ्यांच्या जीवनातील वसुबारसेचे महत्त्व, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Vasu Baras : शेतकऱ्यांसाठी खरी दिवाळी (Diwali) वसुबारस पासून सुरु होते. शेतकरी या दिवशी गाय आणि वासरांची मनोभावे पूजा (Worship) करतात.

खरतर हा दिवस (Vasu Baras 2022) गाय आणि वासरांबद्द्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. त्यामुळे या दिवसाचे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप महत्त्व (Importance of Vasu Baras) आहे.

वसु बारस

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीपासून सुरू होते. या दिवशी संपूर्ण राज्यातील शेतकरी वसुबारस हा विशेष सण साजरा (Vasu Baras in 2022) करतात. या दिवशी समुद्रमंथनातून कामधेनू प्रकट झाली असे मानले जाते. आणि दरवर्षी याच दिवसाच्या स्मरणार्थ कामधेनू स्वरूपा गौमातेची देशभरात ठिकठिकाणी पूजा करण्याची परंपरा आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनातील वसुबारसेचे महत्त्व

शेतकऱ्यांच्या जीवनात गाय आणि वासरांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा सण मुळात गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची संयुक्त पूजा केली जाते. पूजेदरम्यान त्यांना गव्हापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जातात.

वसुबारस साजरा करण्यामागचे कारण

या दिवशी घरातील गोधनाची पूजा करतात. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासोबतच गायीची पूजा करतात. या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.

या दिवशी गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.

भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही गोधनाची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची परंपरा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe