Vasu Baras : वसू बारस का साजरी केली जाते? जाणून घ्या या सणाचे महत्त्व

Vasu Baras : धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) एक दिवस अगोदर वसू बारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाचे म्हणजे या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप महत्त्व (Importance in Farmer Life) आहे.

गाय आणि वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी (Vasu Baras in 2022) सर्व शेतकरी (Farmer) त्यांची मनोभावे पूजा (Worship) करतात.

वसू बारसचे महत्त्व

गाय हा हिंदू संस्कृतीतील (Hindu culture) एक अत्यंत पवित्र प्राणी आहे आणि प्रत्येक मानवाला पोषण पुरवत असल्याने ती पवित्र माता म्हणून पूजनीय आहे.या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी नंदिनी व्रत ठेवतात.

असंही मानलं जातं की जे निपुत्रिक जोडपे या दिवशी गायीची पूजा करतात आणि व्रत करतात, त्यांना लवकरच अपत्यप्राप्ती होते.या उपवासात भक्त कोणतेही दुग्धजन्य पदार्थ किंवा गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात.

कार्तिक कृष्ण द्वादशी ही गोवत्स द्वादशी म्हणून ओळखली जाते.याला बाच बारसचा सण असेही म्हणतात.गुजरातमध्ये याला वाघ बारस असेही म्हणतात.ती एकादशीनंतर येते. वसू बारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe