एसटी संपाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. यातच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. दरम्यान या अहवालासोबतच मुख्यमंत्र्यांचा अभिप्रायही खंडपीठासमोर ठेवण्यात आला.

आता या प्रकरणावर 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलक मुंबईत जमा होण्याची शक्यता आहे.

आंदोलकांना टोलनाक्यांवरच रोखण्यात यावे असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच संप करणारे एसटी कर्मचारी आंदोलक मुंबईत मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या परिसरांमध्ये बंदोबस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान न्यायालय यावर काय निर्णय देणार यावर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून संपामुळे या कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेटबरोबरच कौटुंबिक समस्या देखील वाढल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News