Vicky Kaushal आणि Katrina Kaif ने भाड्याने घेतला नवा फ्लॅट, महिन्याला देणार इतका रेंट…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- अनेकांच्या दिलाची धडकन असणारी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या एन्गेजमेंटच्या बातम्या येत असतानाच, त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची तयारीही जोरात सुरु झाली आहे.

हे हॉट कपल पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये सवाई मधोपूरच्या चौथ का बरवाडा येथील सिक्स सेन्स बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये विवाहबद्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. आता विकी आणि कतरिना या दोघांनी लग्नानंतर एकत्र राहण्यासाठी एक घर बघितल्याचे सांगण्यात आले आहे.

विकी आणि कतरिना गेल्या काही दिवसांपासून घराच्या शोधात होते. अखेरीस त्यांना हवं तसं घर मिळालं आहे. त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एक आलिशान अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे.

हे दोघे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या शेजारी राहणार असल्याचे समजते. विकीने जुहूच्या राजमहल या इमारतीमध्ये ६० महिन्यांसाठी म्हणजे ५ वर्षांसाठी एक अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे.

त्याने जुलै २०२१ पासून आठव्या मजल्यावरील अपार्टमेंट भाड्याने घेतले. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून विकीने १ कोटी ७५ लाख रुपये दिले आहे.

सुरुवातीचे ३६ महिन्यांचे भाडे ८ लाख रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर पुढचे १२ महिने हे भाडं ८ लाख ४० हजार असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!