VIP Number Buying Tips : बाईक आणि कारसाठी कसा मिळवायचा व्हीआयपी नंबर, किती येतो खर्च? जाणून घ्या सोपी पद्धत

Ahmednagarlive24 office
Published:
VIP Number Buying Tips

VIP Number Buying Tips : आजकाल अनेकजण नवीन कार किंवा बाईक खरेदी केल्यानंतर त्यांच्या जुन्या वाहनाचा किंवा नवीन व्हीआयपी नंबर खरेदी करत असतात. तसेच अनेकांना व्हीआयपी नंबर खरेदी करायचा असतो मात्र तो कसा खरेदी करायचा हे माहिती नसते.

देशात व्हीआयपी नंबर खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. लोक त्यांच्या आवडीचा नंबर नवीन कार आणि बाईकसाठी खरेदी करत असतात. त्यासाठी लाखो रुपये देण्यासाठी अनेकजण तयार असतात.

सगळ्यांपेक्षा आपले वाहन वेगळे दिसण्यासाठी आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेकजण व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर खरेदी करत असतात. तसेच काहीजण भाग्यवान नंबर खरेदी करत असतात.

007, 00005, 786 आणि 0001 असे अनेक व्हीआयपी नंबर घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. चला तर जाणून घेऊया व्हीआयपी नंबर खरेदी करण्यासाठी किती खर्च येईल आणि तो कसा खरेदी करायचा?

ऑनलाइन करा व्हीआयपी नंबर बुक

तुम्हाला ऑनलाईन घरबसल्या व्हीआयपी नंबर बुक करायचा असेल तर तुमच्या आवडीचा नंबर निवडा.
त्यांनतर परिवहनच्या अधिकृत https://fancy.parivahan.gov.in/ संकेतस्थळावर लॉगिन करा.
यामध्ये तुम्हाला व्हीआयपी नंबरसाठी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर प्रविष्ट करा किंवा तिथे व्हीआयपी नंबरची यादी पहा.
त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर निवडा आणि त्याला बोली लावा.
त्यानंतर तुम्ही जास्त पैशांची बोली लावून हा नंबर खरेदी करू शकता.

ई-लिलाव निकाल कसा तपासायचा?

जर तुम्हाला व्हीआयपी नंबर खरेदी करताना ई-लिलाव निकाल पाहायचा असेल तर https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
त्यानंतर तुम्ही होम पेजवर जा.
होमपेजवर गेल्यानंतर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरा.
तुम्हाला पाहिजे असलेल्या राज्य, आरटीओ आणि निकालाची तारीख संपूर्ण तपशील भरा.
यानंतर तुम्हाला झालेला लिलाव दिसेल.

भारतात 0000 नंबर प्लेटची किंमत

भारतातील सर्वाधिक महाग नंबर 0001 आहे. याची किंमत 5 लाख रुपये आहे. तसेच दुसऱ्या नंबरला 0002 ते 0009 दरम्यानचे क्रमांक येतात. याची किंमत ३ लाख रुपये आहे. तसेच तिसऱ्या स्थानी 0010 ते 0099, 0786, 1000, 1111, 7777 आणि 9999 क्रमांक येतात याची किंमत 2 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe