Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात कि क्रूझवर एका प्रवाशाने इतकी दारू प्यायली की त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि या दारूच्या नशेत तो अचानक समुद्रात पडला. मात्र त्यानंतर जे घडले ते चमत्कार होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या आखातातील एका क्रूझ जहाजातून बेपत्ता झालेल्या एका प्रवाशाला 15 तासांहून अधिक काळ समुद्रात राहिल्यानंतर वाचवण्यात यश आले आहे. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने ही माहिती दिली.
28 वर्षीय तरुण बुधवारी रात्री आपल्या बहिणीसोबत कार्निव्हल व्हॅलर जहाजावरील एका बारमध्ये गेला होता, परंतु शौचालय वापरल्यानंतर तो परत आला नाही. त्याच्या बहिणीने सांगितले की, त्याने खूप दारू प्यायली होती. नंतर त्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली.
Footage from the rescue of the cruise ship passenger last night. Can also be downloaded here: https://t.co/xk0pBnVr1E pic.twitter.com/GK1IXCKlgx
— USCG Heartland (@USCGHeartland) November 25, 2022
15 तास पाण्यात
अनेक बचाव कर्मचार्यांनी या भागात शोध घेतला आणि अखेरीस गुरुवारी संध्याकाळी लुईझियानाच्या किनार्यापासून सुमारे 20 मैल (30 किमी) अंतरावर हा माणूस दिसला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
यूएस कोस्ट गार्डचे लेफ्टनंट सेठ ग्रॉस यांनी सांगितले की, हा माणूस 15 तासांपेक्षा जास्त काळ पाण्यात राहिला. हा चमत्कार आहे. ग्रॉसने सीएनएनला सांगितले की, त्याने आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत असा प्रसंग पहिल्यांदाच पाहिला होता.
याआधीही एका महिलेचा जीव वाचला आहे
2018 मध्ये, एका 46 वर्षीय ब्रिटीश महिलेला तिचे क्रूझ जहाज अॅड्रियाटिक समुद्रात बुडल्यानंतर 10 तासांनी वाचवण्यात आले. त्यावेळी तिने एका बचाव कर्मचाऱ्याला सांगितले की योग केल्याने ती तंदुरुस्त झाली आहे.
हे पण वाचा :- Second Marriage : दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता तरुण अन् पहिल्या बायकोने घेतली पोलिसांसोबत एन्ट्री आणि मग..