अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे, देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
गतवर्षी याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत, मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मुक्त समजा अशी पोस्ट केली होती. धोनीने केलेल्या निवृत्ताचा धक्का त्याच्या चाहत्यांना बसला होता.
याच पद्धतीने आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या निवृत्तीचे ट्विट व्हायरल झाले आहे.या ट्विटमुळे कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला . या ट्विटमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीला एक वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही निवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे.
मात्र व्हायरल झालेल ट्विट खोटा असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले आहे . विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे.
लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे आणि भारताच्या ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं पहिल्या डावात ३९१ धावा करताना २७ धावांची आघाडी घेतली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम