Vivo V27 : विवो घेऊन येत आहे सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Ahmednagarlive24 office
Published:

Vivo V27 : विवो ही भारतातील आघाडीची दिग्ग्ज टेक कंपनी आहे. कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता पुन्हा एकदा ही कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. लवकरच हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करता येईल.

कंपनी आपली आगामी Vivo V27 सीरीज लाँच करणार आहे. या सीरिजमध्ये Vivo V27 5G आणि Vivo V27 Pro हे दोन स्मार्टफोन असणार आहेत. कंपनीने आपल्या आगामी सीरिजमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. पाहुयात या फोनची सविस्तर माहिती.

इतकी असणार किंमत

कंपनीच्या आगामी Vivo V27 5G स्मार्टफोनची भारतात किंमत रु.35,000 पासून सुरू होऊ शकते. तसेच Vivo V27 Pro या स्मार्टफोनची भारतात सुरुवातीची किंमत 40,000 रुपये इतकी असणार आहे. अहवालानुसार, हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्ट, विवो ई-स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.

हे दोन्ही स्मार्टफोन भारतात येत्या मार्चमध्ये लॉन्च केले जातील. Vivo V27 ही सीरिज भारतात नेमक्या कोणत्या दिवशी लॉन्च होतील हे अजूनही उघड झाले नाही, परंतु लीक केलेले तपशील अचूक असेल तर सीरिज येत्या काही दिवसांत लॉन्च होईल.

अशी असतील फीचर्स

रिपोर्टमध्ये Vivo V27 सीरीजच्या स्पेसिफिकेशनबद्दल काही महत्त्वाची माहिती समोर आली असून सीरीज नवीन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरद्वारे समर्थित असणार आहे. MediaTek ने अजून Dimensity 7200 chipset ची घोषणा केली नसून चिपसेट डायमेंसिटी 8100 चिपसेट आणि डायमेंसिटी 8200 चिपसेटच्या खाली स्लॉट केलेला असावा.

कंपनीचा Vivo V27 Pro हा फोन नवीन MediaTek Dimensity 8200 chipset द्वारे समर्थित असणार आहे, जो iQoo Neo 7 5G च्या बरोबरीने भारतात लॉन्च होण्याची पुष्टी केली आहे, कंपनीचा आगामी Vivo V27 आणि Vivo V27 Pro दोन रंगांमध्ये लॉन्च होणार आहे. हे दोनस्मार्टफोन स्टोरेज कॉन्फिगरेशनसह येतील. याचे बेस मॉडेल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑफर करेल. 256GB स्टोरेजसह उच्च 12GB रॅम पर्याय असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe