Vivo Smartphone Discount : भारतीय टेक बाजारात विवो कंपनी सतत इतर कंपन्यांना टक्कर देत असते. शानदार फीचर्स आणि कमी किमतीत स्पेसिफिकेशन कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून देत असते. कंपनी आपल्या ग्राहकांचा विचार करून सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते.
अशातच कंपनीने काही दिवसांपूर्वी Vivo V27 5G हा प्रीमियम स्मार्टफोन लाँच केला होता. आता तो तुम्ही 30 हजारांच्या बंपर सवलतीसह खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 36,999 रुपये इतकी आहे. यावर अनेक शानदार ऑफर मिळत आहेत.
जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि ऑफर
दिग्ग्ज टेक कंपनी विवोच्या Vivo V27 5G या स्मार्टफोनची मूळ किंमत 36,999 रुपये इतकी आहे. जरी यावर 10 टक्के सूट मिळत असली तरी त्याची किंमत 32,999 रुपये असणार आहे. याशिवाय या फोनवर Axis आणि Citi Bank कार्ड्सवर 10 टक्के सूट उपलब्ध आहे. तसेच कोटक, HDFC आणि ICICI बँक कार्डवर 2500 रुपयांची सूट दिली जात आहे.
इतकेच नाही तर या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरही देण्यात येत आहे. यात तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन बदलावा लागणार आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. त्यामुळे तुम्हाला Vivo V27 स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह दिला जात आहे.
जाणून घ्या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनला 120hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.78 इंच मिळतात. हे ऑक्टा कोअर डायमेन्सिटी 8200 प्रोसेसरद्वारे समर्थित असून यात सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला जात आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध असणार आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून ज्यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 8 MP आणि 2 MP चे आणखी दोन कॅमेरे दिले आहेत. तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. तर पॉवर बॅकअपसाठी, कंपनीकडून 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4600 mAh ची जबरदस्त बॅटरी देण्यात येत आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वायफाय सारखे फीचर्स दिले जात आहेत.