Vivo X90 Pro : लॉन्च होण्याआधीच लीक झाले Vivo X90 Pro चे स्पेसिफिकेशन, कॅमेरासाठी मिळणार हे खास फीचर

Ahmednagarlive24 office
Published:

Vivo X90 Pro : विवोचा नवीन स्मार्टफोन लाँच होण्यास सज्ज झाला आहे. परंतु, Vivo X90 Pro लाँच होण्यापूर्वी त्याचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. लीक झालेल्या रिपोर्टनुसार कंपनी आपल्या आगामी स्मार्टफोनमध्ये कॅमेरासाठी खास फीचर उपलब्ध करून देत आहे.

दरम्यान मागच्या वर्षी कंपनीने नोव्हेंबरमध्ये Vivo X90 आणि Vivo X90 Pro हे Vivo X90 सीरीज अंतर्गत चीनमध्ये लॉन्च केले होते. अशातच आता Vivo X90 Pro चे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती…

लीक झालेल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की, Vivo च्या नवीन फोनमध्ये MediaTek Dimensity 9200 प्रोसेसर उपलब्ध असणार आहे. तसेच Vivo च्या या फ्लॅगशिप फोनमध्ये Zeiss ब्रँडिंग असलेला कॅमेरा मिळेल आणि कॅमेऱ्यासोबत कंपनीचा V2 चिपसेट आपल्याला पाहायला मिळेल. जो खास कॅमेराच्या कार्यक्षमतेसाठी तयार केला आहे.

या नवीन फोनचे डिटेल्स @passionategeekz या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहेत. तसेच या फोनचे पोस्टरही समोर आले आहे. या फोनला 4002 स्क्वेअर मिमीची व्हेपर चेंबर (VC) लिक्विड कूलिंग सिस्टम मिळेल.

या फोनमध्ये तीन मागील कॅमेरे असतील ज्यात एक लेन्स 50 मेगापिक्सेल Sony IMX989 सेन्सर असेल ज्याचा आकार 1 इंच इतका असेल. तसेच दुसरी लेन्स 50-मेगापिक्सेल सोनी IMX758 पोर्ट्रेट सेन्सर आहे. तिसरी लेन्स 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आहे. फोनमध्ये पाच पोर्ट्रेट मोड उपलब्ध असतील, जे Zeiss ने तयार केले आहेत.

मिळणार दमदार बॅटरी

बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर यात 4870mAh बॅटरी उपलब्ध असणार आहे, ज्यासोबत 120W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असेल. हा फोन केवळ 8 मिनिटांत 90 टक्के चार्ज होईल असा दावा केला जात आहे. पोस्टर पाहता, असे म्हणता येईल की हा फोन जागतिक स्तरावर लेजेंड ब्लॅक रंगात लॉन्च केला जाईल, चीनमध्ये तो लाल आणि काळ्या रंगात लॉन्च केला गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe