Vivo Y02t 4G : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता विवोच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आपला शानदार फीचर्स असणारा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करू इच्छित असाल तर जरा थांबा कारण कंपनी स्वस्तात हा फोन लाँच करणार आहे. कंपनीचा लवकरच Vivo Y02t 4G हा स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालताना दिसेल. यात कंपनी 5000mAh बॅटरी देत आहे.
जाणून घ्या आगामी स्मार्टफोनमधील फीचर्स
समजा जर लीक झालेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर विवोचा आगामी फोन एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये येऊ शकतो. हा 4G फोन 6.5-इंचाच्या फुल HD+ डिस्प्लेसह सादर होईल जो डिस्प्ले एलसीडी पॅनेलचा असण्याची शक्यता आहे. आगामी स्मार्टफोन कंपनी 4 GB रॅम सह लॉन्चकरेल. तसेच प्रोसेसर म्हणून, मीडियाटेक हेलिओ मालिकेचा चिपसेट त्यात येईल. लवकरच हा चिपसेट समोर येईल.
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस, तुम्हाला एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. परंतु अजूनही या फोनमध्ये दिल्या जाणाऱ्या उर्वरित कॅमेऱ्यांबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 5000mAh ची असणार आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
विवो लवकरच या फोनच्या लॉन्च तारखेबद्दल अधिकृत माहिती देईल. तसेच या फोनच्या किंमतीबाबत अजूनही कंपनीने कोणती माहिती दिली नाही. इतकेच नाही तर त्याची वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांवरून किमतीचा अंदाज लावायचा झाला तर तो 10,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.