Vivo Y56 5G : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा विवोचा शक्तिशाली स्मार्टफोन, पहा संपूर्ण ऑफर

Vivo Y56 5G

Vivo Y56 5G : बाजारात आता सर्वच कंपन्या आपले 5G स्मार्टफोन लाँच करत आहेत. परंतु त्याच्या किमती जास्त आहेत. अशातच जर तुम्हाला मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे.

तुम्ही आता Amazon च्या सेलमध्ये Vivo Y56 5G हा फोन खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 22,999 रुपये आहे. डीलमध्ये, तुम्ही 26% डिस्काउंटनंतर रु. 16,999 मध्ये हा फोन सहज खरेदी करू शकता. शिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये फोनची किंमत 15,900 रुपयांनी कमी करता येते. यावर बँक ऑफर उपलब्ध आहे.

जाणून घ्या Vivo Y56 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा Vivo Y56 5G हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात कंपनी 8 GB विस्तारित रॅम देखील उपलब्ध करून देत आहे. याच्या मदतीने गरज भासली तर या फोनची एकूण रॅम १६ जीबीपर्यंत जाते. प्रोसेसर म्हणून, कंपनीकडून तुम्हाला Vivo च्या या 5G हँडसेटमध्ये MediaTek Dimension 700 पाहायला मिळेल. तसेच या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.58 इंच असून तो फुल एचडी डिस्प्ले 60Hz चा रिफ्रेश दर आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो ऑफर करत आहे.

इतकंच नाही तर Vivo Y56 5G च्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळतील. यात 50 मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेऱ्याचा समावेश केला आहे. तसेच यात सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह 5000mAh बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय ही बॅटरी 18 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.

याच्या OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर काम करतो. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी, कंपनी वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.1 सह सर्व मानक पर्याय ऑफर करते. हा फोन ब्लॅक इंजिन आणि ऑरेंज शिमर या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. खरेदीसाठी तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आजच हा फोन खरेदी करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe