Vivo X90 series : अखेर शक्तिशाली कॅमेरासह लाँच झाली विवोची आगामी सीरिज, पहा किंमत आणि फीचर्स

Published on -

Vivo X90 series : अखेर दिग्ग्ज टेक कंपनी विवोने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ही कंपनी सतत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त असे स्मार्टफोन लाँच करत असते.

अशातच आता या कंपनीने आपली आगामी सीरिज Vivo X90 series जागतिक स्तरावर लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Vivo X90, Vivo X90+ आणि Vivo X90 Pro यांचा समावेश असणार आहे. लवकरच हे फोन भारतीय बाजारात लाँच केले जाणार आहेत.

कंपनीने भारत, हाँगकाँग, तैवान, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, पोलंड, ऑस्ट्रिया, रोमानिया, क्रोएशिया, ग्रीस, थायलंड, मलेशिया आणि इतर काही बाजारपेठांसाठी सीरिजचे अनावरण केले आहे. परंतु, सध्या या फोनच्या किमतीचा तपशील जाहीर केला नाही. कंपनीने असे सांगितले आहे की या वर्षाच्या शेवटी भारतात पदार्पण करेल.

जाणून घ्या Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची किंमत

हे दोन्ही स्मार्टफोन एकाच स्टोरेज प्रकारात लॉन्च केले आहे: 12GB RAM आणि 256GB स्टोरेज. व्हॅनिला व्हेरिएंटची किंमत MYR 3,699 (अंदाजे रु. 70,000) आहे तर X90 Pro ची किंमत MYR 4,999 (अंदाजे रु. 95,000) इतकी आहे. Vivo X90 हे मॉडेल ब्रीझ ब्लू आणि अॅस्टरॉइड ब्लॅक कलर पर्यायांमध्ये, तर प्रो मॉडेल सिंगल लीजेंड ब्लॅक व्हेगन लेदर पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे.

असे आहेत Vivo X90 चे स्पेसिफिकेशन

कंपनीने या फोनमध्ये 6.67-इंचाचा वक्र FHD+ Q9 अल्ट्रा-व्हिजन AMOLED डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800×1260 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9200 चिपसेटद्वारे समर्थित असून स्टोरेजचा विचार केला तर हे 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 स्टोरेज ऑफर करतो.

हे धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येते. फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर, 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स जो OIS ला सपोर्ट करतो आणि 12MP पोर्ट्रेट कॅमेरा समावेश आहे. तसेच सेल्फीसाठी, यात 32MP कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4810mAh बॅटरी आहे जी 120W ड्युअल सेल फ्लॅशचार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 13 आधारित Funtouch OS 13 आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो.

असे आहेत Vivo X90 Pro चे स्पेसिफिकेशन

कंपनीने या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800×1260 पिक्सेल रिझोल्यूशनसह वक्र FHD+ Q9 अल्ट्रा-व्हिजन AMOLED डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोन समान MediaTek Dimensity 9200 चिपसेटद्वारे समर्थित असून स्टोरेजचा विचार केला तर हे 12GB पर्यंत RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज येते.

हे Android 13 आउट-ऑफ-द-बॉक्स वर आधारित OriginOS वर चालेल.तसेच फोटोग्राफीसाठी, हे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह 50MP प्राथमिक सेन्सर, 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहेत. तसेच सेल्फीसाठी, या फोनमध्ये 32MP फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल. Vivo X90 Pro मध्ये 4890mAh बॅटरी आहे जी 120W फ्लॅशचार्जला सपोर्ट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News