Ration Card Update : देशभरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी शासनाकडून विविध योजना सुरू केल्या जातात. या अंतर्गत गरीब लोकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाचा असतो. यात देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी शासनाने रेशन कार्ड योजना सुरु केली आहे. रेशन कार्ड धारक व्यक्तींना शासनाच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य पुरवले जात आहे. या व्यतिरिक्त रेशन कार्डचा वापर हा विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि एक प्रमुख सरकारी पुरावा म्हणून केला जातो.
अशा परिस्थितीत रेशन कार्ड अपडेटेड असणे अनिवार्य आहे. जर घरात एखादे नवीन सदस्य ऍड झाले असेल तर या सदस्याचे नाव देखील रेशन कार्ड वर जोडणे आवश्यक आहे. अर्थातच जर एखाद्याच्या घरात नवीन मुला-मुलीचा जन्म झाला असेल किंवा नवीन सून घरात आली असेल तर अशा कुटुंबातील रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड करावे लागते.

यामुळे आज आपण रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव कसे ऍड करायचे, यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव ॲड करण्याची प्रोसेस
जर एखाद्या घरात नवीन सून आली असेल आणि त्या सुनेचे रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करायचे असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या आधार कार्डवर नाव अपडेट करावे लागणार आहे. म्हणजेच त्या व्यक्तीचे सासरकडील नाव तसेच पत्ता आधार कार्ड वर अपडेट करावा लागणार आहे. यानंतर मग खाद्य विभागात नवीन सदस्य ऍड करण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी मुलीचं नाव आधीच्या रेशन कार्डमधून हटवून, नव्या रेशन कार्डमध्ये सामिल करण्यासाठी अर्ज करावा लागतो. मात्र ही प्रोसेस करण्यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे.
कोणते डॉक्युमेंट्स लागतील ?
रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्य ऍड करण्यासाठी काही कागदपत्रांची गरज लागणार आहे. यात लहान मुलाचं नाव जोडण्यासाठी कुटुंब प्रमुखाचं रेशन कार्ड, मुलाच्या जन्माचं प्रमाणपत्र आणि मुलाच्या आई-वडिलांच्या आधार कार्डची गरज लागणार अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
तसंच जर नवीन सुनेचं नाव रेशन कार्डमध्ये अपडेट करायच असेल तर आई-वडिलांच्या घरी असणाऱ्या रेशन कार्डमधून नाव कमी करावं लागत. तसेच हे नाव हटवल्याचं प्रमाणपत्र देखील नवीन रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करतांना द्याव लागत. या व्यतिरिक्त मॅरेज सर्टिफिकेट, पतीचं रेशन कार्ड आणि त्या महिलेच्या आधार कार्डची देखील गरज भासते.