Upcoming Electric Bike : भारतीय बाजारपेठेत सतत इलेक्ट्रिक बाईक्स लॉन्च होत आहेत. परंतु, मागणी आणि गरज लक्षात घेता या बाईक्सच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक बाईक खरेदी करत असाल किंवा खरेदी करणार असाल तर जरा थांबा.
कारण लवकरच मार्केटमध्ये एक विदेशी कंपनी आपली सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे. हे लक्षात घ्या की या बाईकची झलक कंपनीने मागील महिन्यात ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दाखवली होती. जाणून घेऊयात किंमत आणि स्पेसिफिकेशन.
Kake इलेक्ट्रिक बाईक
हे लक्षात घ्या की मक्का ही शहरी इलेक्ट्रिक कम्युटर मोटरसायकल लाइन असून कंपनीने मक्का फ्लेक्स आणि मक्का फ्लेक्स वर्क दाखवले आहे. मका फ्लेक्सची रेंज सिंगल चार्जवर सुमारे 54 किमी इतकी आहे तर 1.5 kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. ही एक प्रकारची मिड-माउंट मोटर आहे.
जे चाकावर सुमारे 3.75 bhp आणि 60 Nm पीक टॉर्क बनवते. या बाईकचा टॉप स्पीड 45 किमी प्रतितास इतका आहे. तर मक्का फ्लेक्सला 3 kWh क्षमतेची बॅटरी मिळत असून पीक पॉवर आउटपुट 4.42 bhp पर्यंत जाते. बाईकची रेंज 100 किमी पर्यंत वाढते. या बाईकला चार्ज करण्यासाठी सुमारे 6 तास लागतात.
कल्क इलेक्ट्रिक बाईक
कंपनीने दुचाकींची Kalk रेंज देखील प्रदर्शित केली असून ज्याला एक प्रकारे इलेक्ट्रिक अॅडव्हेंचर बाईक म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कंपनीने Kalk Work सादर केले आहे. याला 2.6 kWh ची बॅटरी मिळत असून याला 86 kmph ची रेंज आहे .
या बाईकची मोटर सुमारे 11 kW किंवा 14.75 bhp बनवते तर चाकावर 252 Nm पीक टॉर्क बनवते. दोन्ही मॉडेल्सचा टॉप स्पीड 90 kmph पेक्षा अधिक असून ग्राउंड क्लीयरन्स 300 mm आहे. परंतु, अजूनही कंपनीने या बाईकच्या किमती जाहीर केल्या नाहीत.