Maharashtra news : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडाच्या मंदिर गाभाऱ्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असल्याने येत्या २१ जुलैपासून दीड महिना भगवती दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराची देखभाल, दुरुस्ती आणि गर्भगृहाला चांदीचा पत्रा बसविण्याच्या कामासाठी ४५ दिवसांच्या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.

भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये म्हणून मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ सप्तशृंगी देवीची प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून ठेवली जाणार आहे. तसेच भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्त निवास व इतर सुविधा याकाळातही सुरू राहतील.