बैलाच्या मानेवरील ओझे हलके करणारी बैलगाडी पाहिलीत का?

Maharashtra news ; उसाने अगर अन्य साहित्य भरलेली बैलगाडी ओढत नेताना बैलांना ती ओढण्यासोबतच ओझेही पेलावे लागते. गाडीचे जू बैलांच्या खांद्यावर असल्याने हेकावे बसत असताना सर्व ओझे त्यांना खांद्यावर पेलावे लागते. यातून बैलांना त्रास होतो, अपघातही होतात.

आता यावर उपाय शोधण्यात आला आहे. बैलगाडीला दोन चाकांसोबतच जू च्या खालच्या बाजूला तिसरे चाक बसविण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या राजरामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सारथी विशेष बैलगाडी तयार केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या बैलगाडीला रॉलिंग सपोर्ट देण्यात आला असून त्यामुळे बैलांच्या मानेवरील ओझे हलके होणार आहे. ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतील सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले,आकाश गायकवाड,ओंकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझं कमी करण्याच्या दृष्टीने “सारथी”हा प्रकल्प हाती घेतला.

“रोलिंग सपोर्ट”हा पर्याय त्यांच्या समोर आला. यातून या विद्यार्थ्यांनी, त्या दृष्टीने टायर आणि इतर साहित्यांच्या माध्यमातून हा”रोलिंग सपोर्ट”बनवला. त्याचा प्रयोग देखील उसाच्या वाहतुकीसाठी करणाऱ्या एका बैलगाडी मध्ये केला आणि तो यशस्वी देखील झाला. आता या रोलिंग सपोर्टच्या पेटंटसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज देखील केला आहे.