वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम…एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम.

तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…अशी काव्यात्मक टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा देखील राज्यभरातील वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता आलेले नाही.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी पंढरपूरात आले. या पार्श्वभूमीवर व विविध मुद्द्यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

या ट्विटमध्ये उपाध्ये यांनी पावसामुळे मुंबई जलमय झाल्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

तसेच, पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत न झाल्याने स्वप्निल लोणकर या तरूणाने केलेल्या आत्महत्येवरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. जनतेचं जगणं कठीण होत असताना मुख्यमंत्री मात्र घरातूनच काम करत असल्याचं उपाध्ये म्हणत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe