अतिवृष्टीचा इशारा! ; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवस महत्त्वाचे..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यांत हाहाकार उडाला. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे राज्यात  मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र संततधार होणाऱ्या कोसळधार पावसामुळे अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. तसेच अनेक रस्ते आणि भाग जलमय झाले आहेत. दरम्यान, राज्यात पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुढील चार दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ठाण्यात आज तर मुंबईतील काही भागांत उद्यापासून अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्या कोल्हापुरात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरं गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. पण तरीही सावध आणि सतर्क राहणं आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe