Sushama Andhare : “वॉरंट बेल आहे बेटा, श्रीकांत संभल जा अभी भी टाईम है”

Ahmednagarlive24 office
Published:

Sushama Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाही सुषमा अंधारे यांनी सल्ला दिला आहे.

भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी कल्याण मतदार संघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात किंवा त्यांना येत्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर सुश्स्म अंधारे यांनी श्रीकांत शिंदे यांना सावध करत निशाणा साधला आहे.

वॉरंट बेल आहे बेटा. श्रीकांत संभल जा. अभी भी टाईम है असा सल्ला सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदे दिला आहे. सुषमा अंधारे यांची कल्याणमध्ये प्रबोधन यात्रा झाली यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

सुषमा अंधारे बोलताना म्हणाल्या, सत्तेच्या स्वार्थासाठी तुम्ही तिकडे गेला. पण तुमच्या हातात सत्ता राहणार नाही. कारण भाजपने तुम्हाला फक्त सत्तेचं गाजर दाखवलं आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांच्या खबऱ्यांनी कामे चोख पार पाडावीत असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

भाजप नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अवमान केला जात आहे. यावरूनही सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपा आणि टीम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न होतोय.

हा प्रकार ठरवून केला जात असून हा सुनियोजनाचा भाग आहे. हे षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवेंद्रजी सभागृहात साधा निंदा जनक प्रस्ताव देखील मांडत नाहीत, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe