Maharashtra News:गणेश विसर्जन मिरवणुकीत खाक्या वर्दीवर पोलिसांनी ठिकठिकाणी नृत्य केले. त्यावरून दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असतानाच पोलिसांना खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत सक्त ताकीद दिली आहे. पोलिसांनी अशाप्रकारे खाकी वर्दीत मिरवणुकीत नाचणे हे अवमानकारक आहे.

त्यामुळे पोलिसांनी अंगावर गणवेश असताना मिरवणुकीत नाचू नये, असे निर्देश कुलवंत सरंगळ यांनी दिले आहेत. राज्यभरातील मिरवणुकांमध्ये पोलीस नाचतानाच्या जवळपास ५० व्हिडिओ क्लिप्स समोर आल्या होत्या.
त्या नंतर या प्रकाराच्या अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी मिरवणुकीत न नाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी खाकी वर्दी अंगावर असताना मिरवणुकांमध्ये नाचता कामा नये, त्यांना तशी परवानगी नाही. हे कृत्य अवमानकारक आणि अक्षम्य आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी म्हटले.