Ahmednagar News : वांबोरी चारीला मुळा धरणातून सोमवारी पाणी सोडण्यात आले. पाथर्डी तालुक्यात कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे वांबोरी चारीचे पाणी लाभ धारक शेतकर्यांसाठी फार महत्त्वाचे असून,
मढी, घाटशिरस, तिसगाव या भागापासुन तलाव भरण्यास सुरुवात करावी. अशी मागणी प्रमुख्याने या भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. तिसगाव येथे पदाधिकारी व शेतकऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली.

यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, तिसगावचे सरपंच इलियास शेख, ग्रामपंचायत सदस्य बिस्मिल्ला पठाण, पंकज मगर, लतीफ शेख यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सोमवारी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी मढी पासून पुढील तलाव तलावात सोडण्याची गरज आहे.
अनेक वेळा टेल पर्यंतच्या पाझर तलावात पाणी येण्या अगोदरच वांबोरी चारीचे पाणी बंद होते. त्यामुळे टेलकडच्या गावांचा व शेतकऱ्यांचा ‘भ्रमनिराश होतो. यावर्षी देखील मुळा धरणातून वांबोरी ‘चारीला पाणी सोडण्यात आलेले असून,
मढी तिसगाव घाटशिरस सातवड या भागातील तलावात प्राधान्याने पाणी सोडण्याची व्यवस्था पाटबंधारे विभागाने करावी, अशी मागणी यावेळी उपस्थित लाभधारक शेतकऱ्यांनी केली.