अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- अहमदनगर शहराला मुळा धरण, विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यतच्या केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजने कामामधील सर्व अडचणी दूर झाल्या असून शहराला लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
वसंत टेकडी येथे अमृत योजनेमधून 50 लाख लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण झाले असून याद्वारे नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती, महापौर बाबासाहेब वाकळेे यांनी दिली.
शनिवारी महापालिकेच्यावतीने अंतिम टप्प्यातील जोडणी काम हाती घेतले आहे. त्या कामाची पाहणी महापौर वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांनी केली. वसंत टेकडी येथील जुनी 67 लाख लीटर पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम