मुंबई : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी दिल्लीला (Delhi) जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्लाही दिला आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, राज्य कसं चालवायचं ते देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शिका. तसेच तत्त्व काय असतात हे उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही.
ज्यांनी भाजपच्या (BJP) पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याकडे कोणतीही तत्त्व नाहीत. लोकप्रतिनिधींना आणि महिलेला कशी वागणूक द्यायची, हे त्यांनी आधी शिका असा सल्लाही नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे ज्या प्रमाणे शृड बुद्धीने राजकारण करतायत, त्याविरोधात नवनीत राणांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनीही पाच वर्षे सरकार चालनलंय अशा प्रकारे सुडाचं राजकारण त्यांनी कधीही केलं नाही. त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी शिकलं पाहिजे असेही त्या म्हणाल्या आहेत.
पुढे बोलताना राणा म्हणाल्या, गुंडशाही आणि दंगा आम्ही नाही तर उद्धव ठाकरेंच्या गुंडानी केला, आमच्या मुंबई आणि अमरावतीच्या दोन्ही घरांवर गुंडे पाठवून दंगल केली असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्हाला 20 फूट खड्ड्यात गाढून देऊ, असं म्हटलं त्यावर आम्ही तक्रार केली तेव्हाही काहीच कारवाई झाली नाही. याविरोधात आम्ही दिल्लीत जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
महिलांना कशाप्रकारे वागणूक द्यायची हे उद्धव ठाकरे यांना माहिती नाही. याविरोधात गृहमंत्री, प्रधानमंत्री आणि ओम बिर्ला साहेब तक्रार करणार असल्याचेही नवनीत राणा यांनी सांगितले आहे.