अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- आजवर कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांची दहशत होती. मात्र या दोन तालुक्यातील पंचवीस वर्षे सुरू असलेली दहशत आम्ही संपवली आहे. बाहेरून गुंड बोलवुन दहशतीचे राजकारण होत होते मात्र हे राजकारण आम्ही मोडुन काढले.
अशी टीका आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता केली. पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादीचे विचार समजले पाहिजेत.
हे विचार कार्यकर्त्यांकडुन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आजवर मतदारसंघात केवळ दहशत पसवण्याचे काम केले जात होते.
आता ते कायमचे संपले आहे. विकासकामे होतच राहतील मात्र शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवुन त्यांना सेवा देण्याचे काम आम्ही करत आहोत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकामध्ये राष्ट्रवादीची सत्ता यावी, यासाठी जोमाने कामाला लागले पाहिजे कारण कर्जत जामखेडमधुन आपल्याला भाजप हद्दपार करायची आहे.